शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये कोळसा खाणीत जमीन खचली, 10 जणांचा मृत्यू

By admin | Updated: December 30, 2016 14:33 IST

झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 30 - झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली असून 10 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.  40 ते 50 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही मशिन्सदेखील अडकल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरफ) टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. दुर्घटना झाली तेव्हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) एक तुकडी घटनास्थळी होती, मात्र त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नसून सर्व सुरक्षित आहेत. ही खाण ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडची आहे. गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणा-या भोडाय गावात ही दुर्घटना घडली आहे. 
 
ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून सीआयएसएफचे दोन अधिकारी आणि 21 कॉन्स्टेबलना घटनास्थळी पाठवलं आहे. सध्या दोन लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींनी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
धुक्यामुळे रात्री बचावकार्य सुरु करण्यात अडथळा आल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली, आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. जमीन खचल्याने जवळ असणारे विजेचे खांब कोसळल्याने परिसरात अंधार झाला होता. ज्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. 
 
मुख्यमंत्री रघुबर दास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी संबंधित अधिका-यांकडून बचावकार्याची पुर्ण माहिती घेतली आहे.