शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगानं राज्यपालांना दिला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 12:18 IST

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे.

रांची-

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. आयोगानं आपला अहवाल सादर केला असून सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी राहीलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार निवडणूक आयोगानं याप्रकरणातील सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगानं यासंदर्भातील पत्र देखील राज्यपालांना पाठवलं आहे. 

ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आमदारकीवर टांगती तलवार असताना त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. भाजपचे गोड्डा मतदार संघातील खासदार डॉ निशिकांत दुबे यांनी नुकतंच ट्विट करून झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या पत्नीच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की सीएम हेमंत सोरेन हे देखील आता बिहारमध्ये २५ वर्षांपूर्वी ज्यापद्धतीनं राजद प्रमुख लालू प्रसाद यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री करुन धक्का दिला होता. त्याचधर्तीवर आता झारखंडमध्येही प्रयोग केला जाऊ शकतो. लालू प्रसाद यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडण्यापूर्वी पत्नी राबडी देवी यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं होतं. आता मुख्यमंत्री हेमंत सोरेनही त्याच मार्गावर चालणार असल्याची चर्चा आहे.

प्रकरण काय?

  • हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत स्वत:च्या भावाच्या कंपन्यांना खाणी लीजवर दिल्याचा आरोप आहे. 
  • त्यावेळी हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदासोबतच खनिज मंत्रालयाचीही जबाबदारी पार पाडत होते. 
  • ईडीनं नुकतंच खणीकर्म सचिव पूजा सिंघल यांना मनीलाँड्रींग प्रकरणात अटक केली. पूजा यांनीच खाण प्रकल्पात लायसेन्स जारी केले होते. 
टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग