शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदी आणि अमित शाह..."; भाजप प्रवेशासंदर्भात चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:57 IST

चंपाई सोरेन यांनी सादारणपणे महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे...

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आपल्याला पूर्ण विश्वास असल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे. तसेच आता आपण एक नवा अध्याय सुरू केला असल्याचेही ते म्हणाले.

चंपाई सोरेन म्हणाले, "आपण निवृत्त होण्याचा विचार केला होता. मात्र, जनतेच्या मागणीमुळे राजकारणात आहे. स्वतःचे संघटन तयार करण्यासाठी वेळ लागत असतो. आपण आपले मत यापूर्वीच सांगितले होते." महत्वाचे म्हणजे, चंपाई सोरेन यांचा भाजप प्रवेश हा सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चासाठी (जेएमएम) मोठा धक्का मानला जात आहे. तर, भाजप चंपाई सोरेन यांचा एक मोठा आदिवासी नेता म्हणून पक्षात समावेश करण्यास उत्सुक आहे.

चंपाई सोरेन यांनी सादारणपणे महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी झारखंड भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा देखील उपस्थित होते.

हिमंता बिस्वा सरमा यांनी या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, "आपल्या देशातील ज्येष्ठ आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ते 30 ऑगस्ट रोजी रांची येथे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतील."

आदिवासी मतांवर लक्ष -2011 च्या जनगणनेनुसार झारखंडची लोकसंख्या 3 कोटी 29 लाख 88 हजार 134 एवढी आहे. यात आदिवासी (एसटी) समाजाचा सहभाग 86 लाख 45 हजार 42 एवढी आहे. झारखंड टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले चंपाई सोरेन कोल्हान प्रदेशातून येतात. या प्रदेशात सरायकेला, पूर्व सिंगभूम आणि पश्चिम सिंगभूम जिल्ह्यांचा समावेश होतो. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारणBJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा