झारखंडमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
By Admin | Updated: December 23, 2014 13:15 IST2014-12-23T09:55:28+5:302014-12-23T13:15:31+5:30
महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ झारखंडमध्येही मोदी लाटेचा करिश्मा दिसत असून राज्यात भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.

झारखंडमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २३ - महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ झारखंडमध्येही मोदी लाटेचा करिश्मा दिसत असून राज्यात भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. ८१ पैकी ४१ जागांवर भाजपा आघाडीवर असून पक्षाला एकहाती सत्ता मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. झामुमो १७ जागांवर, काँग्रेस ७ व झाविमो ७ व अन्य ९ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपाच्या बहुमतामुळे झारखंडमधील आघाडीच्या राजकारणाला सुरूंग लागला आहे. दरम्यान झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा माझगावमधून पराभूत झाले आहेत.
२००० साली बिहारपासून स्वतंत्र झालेल्या झारखंडने गेल्या १४ वर्षांत ९ सरकारे पाहिली असून तीन वर्ष राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.२००५ व २००९ साली स्पष्ट बहमुताच्या अभावा झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट होती.