शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ दिवसांत सुटली; नवऱ्यासोबत आक्रित घडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:35 IST

तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे लग्नानंतर सात दिवसांनी रेल्वेची धडक बसल्याने वराचा मृत्यू झाला. झाशी-कानपूर रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस तपास करत आहेत. हा तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.

हे संपूर्ण प्रकरण झाशी जिल्ह्यातील भरोसा गावातील आहे, जिथे २१ वर्षीय शिवम अहिरवार हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची मोठी बहीण संगीता विवाहित आहे. वडील शेती करतात. तरुणाचे काका जयप्रकाश यांनी सांगितलं की, शिवम हा बलरामपूर येथे त्याच्या भावोजीच्या घरी राहत असताना पाणीपुरीचं काम करायचा. 

११ डिसेंबर रोजी त्याचं लग्न दतिया येथील कालीपुरा गावात राहणाऱ्या काजलसोबत झाला होता. लग्नानंतर सून घरीच होती. घरात आनंदाचे वातावरण होतं. मात्र एक दिवस अचानक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिवम दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद होता.

कुटुंबीयांना संशय आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. दुपारी रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह शिवमचा होता. याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. नवविवाहित वधू काजल बेशुद्ध पडली.

याप्रकरणी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गोपीनाथ सोनी यांनी सांगितलं की, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश यांच्याकडून माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. सध्या पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न