शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 09:00 IST

इम्फाळमधील थांगमेईबंद भागातील ख. जॉयकिशन सिंह यांच्या घरातील अनेक वस्तूंचीही जमावाने तोडफोड केली आहे. घरावर जमावाने हल्ला केला तेव्हा हे आमदार दिल्लीत होते.

इम्फाळ : मणिपूरमधील जनता दल (यू)चे आमदार ख. जॉयकिशन सिंह यांच्या घराची १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जमावाने नासधूस केली होती. त्यावेळी त्या लोकांनी घरात ठेवलेली १८ लाख रुपयांची रोख रक्कम व दीड कोटी रुपये किमतीचे दागिने लुटल्याची तक्रार या आमदारांच्या आईने पोलिसांत दाखल केली आहे. 

इम्फाळमधील थांगमेईबंद भागातील ख. जॉयकिशन सिंह यांच्या घरातील अनेक वस्तूंचीही जमावाने तोडफोड केली आहे. घरावर जमावाने हल्ला केला तेव्हा हे आमदार दिल्लीत होते. थांगमेईबंद येथील टॉम्बिसाना उच्च माध्यमिक विद्यालयात उभारण्यात आलेल्या मदत शिबिरातील एका विस्थापित व्यक्तीने सांगितले की, आमदारांच्या घरात बटाटे आणि कांदे तसेच थंडीसाठी उपयोगी ठरणारे कपडे यांचा साठा ठेवलेला होता. या वस्तूंचे विस्थापित लोकांमध्ये वाटप करण्यात येणार होते. मात्र जमावाने हे सर्व साहित्य  लुटले तसेच आमदाराच्या घरातील लॉकर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर यांची तोडफोड केली. तेथील सात गॅस सिलिंडरही पळविण्यात आले.

‘संपूर्ण मणिपुरात अफस्पा कायदा लागू करा’

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटलेली शस्त्रे परत मिळविण्यासाठी अफस्पा हा कायदा संपूर्ण मणिपूरमध्ये लागू करा, अशी मागणी त्या राज्याच्या विधानसभेतील कुकी जमातीच्या १० आमदारांनी केली आहे. 

भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीच्या सात आमदारांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये हिंसाचारग्रस्त जिरिबामसहित सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केंद्र सरकारने अफस्पा कायदा १४ नोव्हेंबर रोजी लागू केला होता. 

सीएपीएफच्या आणखी कंपन्या तैनात 

मणिपूरमधील वाढता हिंसाचार पाहून तिथे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आणखी आठ कंपन्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्या बुधवारी दाखल झाल्या तर त्याच्या एक दिवस आधी सीएपीएफच्या ११ कंपन्या पोहोचल्या होत्या. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस