जेठमलानी-भाजपा यांच्यात अखेर समझोता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:32 IST2018-12-08T04:32:24+5:302018-12-08T04:32:30+5:30
भाजपने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांना निलंबित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर जेठमलानी यांनीही निलंबनाला आव्हान देणारा अर्ज मागे घेण्याचा आणि प्रकरण संपविण्याचा निर्णय मागे घेतला.

जेठमलानी-भाजपा यांच्यात अखेर समझोता
नवी दिल्ली : भाजपने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांना निलंबित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर जेठमलानी यांनीही निलंबनाला आव्हान देणारा अर्ज मागे घेण्याचा आणि प्रकरण संपविण्याचा निर्णय मागे घेतला. भाजप व जेठमलानी यांच्या विनंतीनुसार प्रलंबित खटला संपविण्यास दिल्लीच्या न्यायालयाने संमती दिली.
राम जेठमलानी यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर जेठमलानी यांनी भाजपविरुद्ध खटला दाखल करून पक्षाकडून ५० लाख रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुमित दास यांनी भाजप आणि ९५ वर्षे वयाचे अॅड. जेठमलानी यांच्यातील खटला समाप्त केला.