जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक, जमीन हडपल्याचा आरोप

By Admin | Updated: July 2, 2017 11:30 IST2017-07-02T11:30:03+5:302017-07-02T11:30:03+5:30

विमानसेवा देणारी कंपनी जेट एअरवेजचे उपाध्यक्ष (सुरक्षा) अवनीत सिंह बेदी यांना अटक करण्यात आल्याचं वृत्त

Jet Airways Vice President arrested, land grabbing | जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक, जमीन हडपल्याचा आरोप

जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक, जमीन हडपल्याचा आरोप

ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. 2 -विमानसेवा देणारी कंपनी जेट एअरवेजचे उपाध्यक्ष (सुरक्षा) अवनीत सिंह बेदी यांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. गाझियाबादमधून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.  
 
नगरपालिकेच्या जमिनीवर कब्जा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोपांनुसार अवनीत सिंह बेदी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नगरपालिकेच्या कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा केला. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गाझियाबादच्या साहिबाबाद येथून त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.  
 
चौकशी पूर्ण जाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांकडून याबाबत अदिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.   

Web Title: Jet Airways Vice President arrested, land grabbing