शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

2019 पासून विद्यार्थ्यांना मिळणार JEE आणि NEET चे मोफत क्लास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:12 IST

उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे.

 नवी दिल्ली - उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. उच्च शिक्षणासाठी पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी म्हणजे 2019 पासून सरकारकडून मोफत क्लासची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे JEE आणि NEET सारख्या परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी घेणे शक्य होणार आहे. सरकारने उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी गठीत केलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमुळे हे शक्य होणार आहे. JEE आणि NEET च्या अभ्यासक्रमांच्या मोफत क्लास साठी एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) आपल्या 2 हजार 697 सराव केंद्रांना दोन वर्षांत शिक्षण केंद्रांमध्ये परिवर्तीत करणार आहे.  मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही  शिक्षण केंद्रे 8 सप्टेंबरपासून सुरू होतील.   या केंद्रामधून मे 2019 पासून शिकवण्या सुरू होतील. पहिल्या फेरीत एनटीए जेईई-मेन या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेईल. जे विद्यार्थी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळांवरून एनटीएसाठी नोंदणी करतील त्यांना NEETUG आणि JEE द्वारे आयोजित होणाऱ्या सराव परीक्षेत सहभागी होता येईल. त्याबरोबरच या विद्यार्थ्यांना एनटीएच्या शिक्षकांबरोबर चर्चाही करता येईल. त्यामुळे अभ्यासात झालेल्या चुका समजण्यास त्यांवा मदत होईल. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सराव केंद्रांमध्ये सर्वप्रथम जेईई मेनच्या विद्यार्थ्यांना मॉक परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. नीट-यूजीची सध्यातरी संगणकावर आधारीत परीक्षा घेण्यात येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी कुठलीही मॉक परीक्षा आयोजित केली जाणार नाही.  यासाठी एनटीए 1 सप्टेंबर रोजी मोबाइल अॅप आणि वेबसाइट लॉन्च करणार आहे. त्याच दिवशी यूजीसी-एनईटी-2018 आणि जेईई मेन साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. ही नोंदणी 30 सप्टेंबरपर्यंत चालेल.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणIndiaभारतnewsबातम्या