शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:11 IST

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यातील कुरबुरी वाढल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा, यासाठी जदयू भाजपाच्या हात धुवून मागे लागला आहे. मात्र, भाजपा यासाठी फार उत्सुक नसल्याचे चित्र आहे.जदयूच्या नेत्यांना जागावाटपाच्या अपेक्षांविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, रालोआतील सर्व घटकपक्षांनी एकत्र बसून याचा निर्णय घ्यायला हवा. सद्यपरिस्थितीचा विचार करून प्रत्येक पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या पाहिजेत, असे जदयूच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, भाजपाला पुन्हा एकदा 2014 सारखे यश मिळवायचे असल्याने जागावाटपात त्यांच्या जास्त अपेक्षा असतील, याकडे प्रसारमाध्यमांनी जदयूच्या नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जदयूच्या नेत्यांनी म्हटले की, ही 2014 नव्हे तर 2019 ची निवडणूक आहे, हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल पाहता जनमतात बदल झाल्याचेही दिसत आहे. तसेच 2014 चे निकष लावायचे झाल्यास भाजपाने बिहारमध्ये 40 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता. या जागांचा विचार करता भाजपाला विधानसभेच्या  243 पैकी 173 जागांवर यश मिळू शकले असते. तर त्यावेळी जदयूला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. रामविलास पासवान आणि उपेंद्र सिंह कुशवाह यांच्या पक्षालाही अनुक्रमे सहा आणि तीन जागा मिळाल्या होत्या. मग आता आगामी निवडणुकीत एवढ्याचा जागा लढवायच्या का, असा सवालही जदयूच्या नेत्यांनी विचारला. या पार्श्वभूमीवर आता भाजपा आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Vidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाPoliticsराजकारण