शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 13:40 IST

जदयूच्या मागणीला भाजपनेही पाठिंबा दर्शवला.

nitish kumar news : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी केली. बिहारमध्ये आज जदयूची राज्य कारकारिणीची बैठक होत आहे. अशातच राजधानी पाटणा येथील जदयूच्या प्रदेश कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आहे. नितीश कुमारांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जदयूच्या सर्व नेत्यांच्या वतीने करण्यात आली आहे. जदयूचे सरचिटणीस छोटू सिंह यांनी हे पोस्टर लावले आहे.

"नितीश कुमार यांनी जगभरात नाव कमावले आहे. शीख समुदायाचे लोक नितीश कुमार यांचे कौतुक करतात. अमेरिका असो, ब्रिटन असो वा कॅनडा, सर्वांनीच नितीश कुमार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. बिहारच्या विकासात त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी नितीश कुमार यांना भारतरत्न मिळावा", अशी मागणी असल्याचे सरचिटणीस छोटू सिंह म्हणाले. तसेच आम्ही राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही आमच्या भावना व्यक्त करू. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केलेले काम ऐतिहासिक आहे. आम्ही आमच्या मागण्या भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासमोर मांडू आणि गरज पडल्यास आम्ही दिल्लीत जाऊन आमच्या मागण्या जोरदारपणे मांडू, असेही त्यांनी सांगितले. 

नितीश यांना भारतरत्न देण्याची मागणी दरम्यान, जदयूसोबत बिहारमध्ये सरकारमध्ये असलेल्या भाजपने देखील नितीश कुमार यांना भारतरत्न द्यायला हवा या मागणीला पाठिंबा दिला. भाजपचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, जदयूने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली, यात चुकीचे काय आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत येऊन जंगलराज असलेल्या बिहारमध्ये सुशासन प्रस्थापित केले. अंधारात असलेल्या बिहारला प्रकाशात आणण्याचे काम केले. जिथे चालण्यासाठी रस्ते नव्हते तिथे आमच्या सरकारच्या मदतीने पूल आणि रस्ते बांधले. त्यामुळे या मागणीला आमचा कोणताही आक्षेप नाही.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा