शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 17:57 IST

भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी आठ आमदारांचा पाठिंबा आवश्यक

बंगळुरु: कर्नाटकची विधानसभा त्रिशंकू स्थितीत असल्यानं आमदारांच्या फोडाफोडीला वेग आल्याचं चित्र दिसतं आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 37 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे जेडीएसनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र भाजपाच्या नेतृत्वानं एका रात्रीत जेडीएस आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपानं कर्नाटकात 'गोवा पॅटर्न' राबवला आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या 12 नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली आहे. तर जेडीएसचे दोन आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याचं वृत्त आहे. भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आठ आमदारांची आवश्यकता आहे आणि काँग्रेस-जेडीएसच्या 'गायब' झालेल्या आमदारांची एकूण संख्या 14 इतकी आहे. त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. 

जेडीएसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पक्ष कार्यालयात बैठक होती. मात्र या बैठकीला राजा व्यंकटप्पा नायका आणि व्यंकटा राव नाडागौडा हे दोन आमदार अनुपस्थित राहिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. काँग्रेसच्या आमदारांचीही आज पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. काँग्रेसचे 78 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी 66 आमदार बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे 12 आमदार नेमके गेले कुठे, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी लगेचच राजभवन गाठून सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेस-जेडीएसचे आमदार त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या संपर्कात नसताना येडियुरप्पा यांनी आपण उद्या सत्ता स्थापन करू, असा दावा केला. त्यामुळे भाजपानं कर्नाटकमध्ये गोवा पॅटर्न राबवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गोव्यात सर्वात मोठा पक्ष नसतानाही भाजपानं काँग्रेसला धक्का देत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळीही एका रात्रीत भाजपाच्या चाणक्यांनी राजकीय जुळवाजुळव केली होती.

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस