शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 06:48 IST

भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.

कोल्हापूर/काेलकाता/पाटणा - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मतांनी पराभव केला. जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. नोटाला १,७९९ मतदारांनी पसंती दिली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. रिंगणात तब्बल १५ उमेदवार असले तरी लढत दुरंगीच होती. तर  पश्चिम बंगालसह बिहार, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या अनुक्रमे लोकसभेची एक तर विधानसभेच्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. दोन्ही उमेदवारांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 

सिन्हा पुन्हा संसदेतशत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसाेल येथून भाजपच्या अग्निमित्रा पाॅल यांचा २ लाख ६४ हजार मतांनी पराभव केला. बाबूल सुप्रियाे यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली हाेती. बाबूल सुप्रियाे यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या तिकिटावर याठिकाणी विजय मिळविला हाेता. 

बिहारमध्ये राजदबिहारच्या बाेचहांमध्ये राजदचे उमेदवार अमर पावसान यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा ३६ हजार ६५८ मतांनी पराभव केला. 

खैरागडमध्ये काँग्रेसछत्तीसगडमधील खैरागडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार यशाेदा वर्मा यांनी भाजपाच्या काेमलसिंह जंघेल यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरwest bengalपश्चिम बंगालBiharबिहार