शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

जया बच्चन यांना यूपीतून सपाने दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 2:13 PM

समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातून अभिनेत्री जया बच्चन यांच्या नावाची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातून अभिनेत्री जया बच्चन यांच्या नावाची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.  यूपीमधील सपा आमदारांची संख्या पाहता जया बच्चन यांचं पुन्हा राज्यसभेत जाणं निश्चित मानलं जातं आहे. उत्तर प्रदेशात 23 मार्च रोजी राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होते आहे. समाजवादी पक्षाकडे सध्या 403 पैकी 47 आमदार आहेत. एका राज्यसभेच्या जागेसाठी 38 आमदारांची आवश्यकता आहे. संख्याबळ पाहता जया बच्चन यांचा विजय निश्चित मानाला जातो आहे. येत्या 3 एप्रिलला जया बच्चन यांच्या राज्यसभेतील खासदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या तीन टर्म त्या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. 

जया बच्चन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने राज्यसभेचं तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी जोरदार लॉबिंग केली होती. मात्र अग्रवाल यांचा पत्ता कट करत पक्ष नेतृत्वाने जया बच्चन यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापैकी 10 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 पैकी 312 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत झालेल्या पराभवामुळे समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या समाजवादी पक्षाची साथ सोडून तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात होती. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत जया बच्चन पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता होती. पण आता जया बच्चन यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.