जवखेडे हत्याकांड : लवकरच सुरू होणार सुनावणी
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:12+5:302015-08-18T21:37:12+5:30
विशेष सरकारी वकीलपदी उमेशचंद्र यादव

जवखेडे हत्याकांड : लवकरच सुरू होणार सुनावणी
व शेष सरकारी वकीलपदी उमेशचंद्र यादव पुणे : पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील जवखेडे गावातील तिहेरी हत्याकांड खटल्यात राज्य सरकारने सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. येत्या काही दिवसातच या प्रकरणाची नगरच्या जिल्हा न्यायालयात नियमीत सुनावणी सुरू होईल.संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री जाधव, मुलगा सुनील जाधव अशा एकाच घरातील तीन जणांच्या अमानुष हत्येमुळे (२० ऑक्टोबर २०१४) हे प्रकरण राज्यात गाजले होते. त्याला जातीय रंग आल्यामुळेही त्याची चर्चा झाली. पोलीस तपासानंतर कुटुंबातील भांडणामुळेच संबधितांच्या नातेवाइकांनीच हे हत्याकांड केले असल्याचे उघड झाले. प्रशांत, अशोक व दिलीप जाधव अशा तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.खुनाचे प्रकरण असल्यामुळे पाथर्डी प्रथम वर्ग न्यायालयाने हा खटला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केला असून सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून यादव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यादव मूळचे कोल्हापूरचे असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर निर्णय झालेला नाही. त्या निर्णयानंतर या खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरूवात होईल. (प्रतिनिधी)----------