पाकच्या गोळीबारात जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 00:18 IST2020-08-02T00:18:26+5:302020-08-02T00:18:45+5:30

रोहिन कुमार हे हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचे रहिवासी होते.

Jawan martyred in Pakistani firing | पाकच्या गोळीबारात जवान शहीद

पाकच्या गोळीबारात जवान शहीद

जम्मू : जम्मू- काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजीक शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार करुन पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. संरक्षण दलाच्या एका प्रवक्त्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने शत्रूच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात जवान रोहिन कुमार हे गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

रोहिन कुमार हे हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचे रहिवासी होते. गत एक महिन्यापासून पाकिस्तानकडून दिवसातून एक किंवा दोनदा गोळीबार केला जात आहे. हमीरपूर जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २५ वर्षीय कुमार यांचा नोव्हेंबरमध्ये विवाह होणार होता. ते २०१६ मध्ये पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली होती.

Web Title: Jawan martyred in Pakistani firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.