शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Javed Akhtar: "मग न्याय अन् माणुसकी विसरून जा", तालिबान्यांना पाठिंबा देणाऱ्यांना जावेद अख्तरांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 10:26 IST

javed akhtar: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत.

javed akhtar: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत. जगातील प्रत्येक लोकशाही प्रधान देशानं तालिबानला मान्यता देण्यास स्पष्ट नकार द्यायला हवा. तसंच अफगाणिस्तानातील महिलांवर अन्यायासाठी तालिबानचा कठोर निषेध करायला हवा, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. 

जावेद अख्तर नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतात. त्यांच्या विधानांमुळे अनेकदा वादही निर्माण होतात. अख्तरांनी याआधी देखील तालिबानचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आता पुन्हा एकदा जावेद अख्तर यांनी ट्विट करत तालिबानी सत्तेला पाठिंबा देणाऱ्या देशांवर निशाणा साधला आहे. "प्रत्येक सभ्य व्यक्ती, लोकशाही प्रधान सरकार, जगातील प्रत्येक समाजानं तालिबान्यांना मान्यता देण्यास नकार द्यायला हवा. अफगाणिस्तानातील महिलांवरील अन्यायाबाबत सर्वच देशांनी निंदा केली पाहिजे अन्यथा न्याय, माणुसकी आणि विवेक असे शब्द विसरावे", असं रोखठोक मत अख्तरांनी व्यक्त केलं आहे. 

तालिबानच्या प्रवक्त्यावरही साधला होता निशाणातालिबानी प्रवक्ता सय्यद झकीरुल्लाह यानं महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचाही जावेद अख्तर यांनी समाचार घेतला होता. "तालिबानी प्रवक्त्यानं जगाला सांगितलं की महिला मंत्री बननण्याचा लायकीच्या नाहीत. त्या फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी आहेत. असं विधान करणाऱ्यांच्या सरकारला मान्यता देण्याची तयारी कथित लोकशाही प्रधान देशांनी केली आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे", असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं. 

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान