जसवंतसिंग यांची प्रकृती गंभीरच
By Admin | Updated: August 10, 2014 03:29 IST2014-08-10T03:29:11+5:302014-08-10T03:29:11+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे जीवनरक्षक प्रणालीवर असून त्यांच्यावर न्यूरोसजर्न व क्रिटिकल केअर तज्ज्ञांचे एक पथक देखरेख करीत आहे.

जसवंतसिंग यांची प्रकृती गंभीरच
>नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे जीवनरक्षक प्रणालीवर असून त्यांच्यावर न्यूरोसजर्न व क्रिटिकल केअर तज्ज्ञांचे एक पथक देखरेख करीत आहे. गुरुवारी रात्री घरामध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. त्यांना लगेचच येथील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ते कोमात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जसवंतसिंग उपचार घेत असलेल्या रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जसवंतसिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी जैसलमेर येथे कार्यकत्र्यानी प्रार्थना केली.