डोक्याला मार लागल्याने जसवंत सिंग जखमी, रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: August 8, 2014 11:47 IST2014-08-08T11:13:23+5:302014-08-08T11:47:30+5:30

माजी भाजप नेते जसंवत सिंग हे घरात पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Jaswant Singh injured, due to beheaded, hospital | डोक्याला मार लागल्याने जसवंत सिंग जखमी, रुग्णालयात दाखल

डोक्याला मार लागल्याने जसवंत सिंग जखमी, रुग्णालयात दाखल

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ८ - माजी भाजप नेते जसंवत सिंग हे घरात पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्याप त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
माजी केंद्रीय मंत्री असणारे जसवंत सिंग काल (गुरूवार) त्यांच्या घरात घसरून पडले आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना आय.सी.युमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण आडवाणी हे सिंह यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. 

Web Title: Jaswant Singh injured, due to beheaded, hospital