शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 10:32 IST

यात्रेकरुंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसचालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत पडली. या हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले बलरामपूर, यूपीचे रहिवासी संतोष कुमार वर्मा यांनी सांगितलं की, शिवखोडीला भेट दिल्यानंतर आम्ही कटराकडे जात होतो. बस वरून खाली येत असताना एका दहशतवाद्याने रस्त्याच्या मधोमध गोळीबार सुरू केला. चालकाला गोळी लागल्याने बस दरीत पडली. दहशतवाद्यांनी सुमारे २० मिनिटे गोळीबार केला. गोळीबार थांबल्यानंतर पोलीस आले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. दहशतवादी  गोळीबार करत होते. ५-६ वेळा गोळीबार केल्यानंतर ते थांबायचे आणि पाच मिनिटांनी पुन्हा गोळीबार सुरू करायचे.

यूपीच्या गोंडा येथील रहिवासी नीलम गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही शिवखोडीला भेट दिल्यानंतर येत होतो. दहशतवाद्यांनी गोळीबार केला, गोळी बसचालकाला लागली आणि बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ती दरीत पडली. बस दरीत कोसळली तेव्हा आम्हाला दहशतवादी दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह ४० लोक होते. आमच्या हातापायांना लागलं आहे. 

नीलम गुप्ता यांचा मुलगा पल्लव याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही बसमध्ये होतो आणि कोणी गोळीबार केला हे आम्हाला माहीत नाही. आवाज कमी झाल्यावर आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. काही वेळ गोळीबार झाला नाहीत, आम्ही दरीत पडलो. आमचे डोकं सीटखाली अडकलं, माझ्या बाबांनी मला बाहेर काढलं.

एका यात्रेकरूने सांगितलं की तेथे ६-७ दहशतवादी होते, त्यांचे चेहरे मास्कने झाकलेले होते. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरलं आणि गोळीबार केला. बस दरीत पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही गप्प बसलो होतो. शिवखोडी येथून वैष्णोदेवीला संध्याकाळी ६ वाजता बस गेल्यानंतर ३० मिनिटांनी ही घटना घडली.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, यात्रेकरूंवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही. रविवारी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शाह म्हणाले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी