शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 14:58 IST

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी (9 जानेवारी) सकाळी चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

श्रीनगर - जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी (9 जानेवारी) सकाळी चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. खात्मा करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांमी संयुक्तरित्या परिसरात शोधमोहीम राबवली. शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

 

 

प्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला8 जानेवारी - 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी राजधानी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्याला पोलिसांनी मथुरा जवळील भोपाळ शताब्दीमधून अटक केली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी केली. त्यावेळी आणखी दोन जण दिल्लीमध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये छापा मारला. पण त्यापूर्वीच दोन संशयितांनी पलायन केलं होतं. 26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात आणि अक्षरधान मंदिरावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचे माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळं सध्या दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबी दोन्ही फरार संशयतीचा शोध घेत आहेत.   

सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद6 जानेवारी - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले होते. तर दुसरीकडे,  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता.  

 

 

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर