जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 09:37 IST
जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटाजवळील बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर केला गोळीबार
जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
ठळक मुद्देजम्मू आणि काश्मीर खोरे यांना जोडणाऱ्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला म्मू-श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ आज पहाटे उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान चकमक उडाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर खोरे यांना जोडणाऱ्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ आज पहाटे उडालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटाजवळील बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आहे. तर अन्य दहशतवादी आसपासच्या परिसरात लपून बसले होते. या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराचा ताबा घेत शोधमोहीम सुरू केली होती. अखेरीस या दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात आले. या चकमकीबाबत अधिक माहिती देताना जम्मूचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, आज पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी एक ट्रक तपासणीसाठी थांबवला. त्यावेळी आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. या गोळीबारात एक पोलीस जखमी झाला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.