Jammu Kashmir : Three militants killed in Anantnag along with Hizbul commander | Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

श्रीनगर -  काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते.  ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रू याचाही समावेश आहे. 

आज सकाळी अनंतनागमधील पझलपोरा येथे दोन ते तीन दहशतवादी  लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. अखेरीच लष्कराने तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले. चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा कमांडर नासिर चद्रू यालाही ठार करण्यात आल्याने लष्कराला दहशतवाद्यांविरोधातील लढाईल मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. 


दरम्यान, शोपियाँमध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी एका ट्रकचालकाची हत्या केली. हा ट्रकचालक सफरचंदांची वाहतूक करत होता. तो मुळचा राजस्थानमधील होता. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jammu Kashmir : Three militants killed in Anantnag along with Hizbul commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.