शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Jammu Kashmir: काश्मिरात पुन्हा दहशतवादी हल्ला, शोपियांमध्ये स्थलांतरित मजुरांवर फेकले ग्रेनेड, 2 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 00:31 IST

या दहशतवादी हल्ल्यात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळापळ करत होते. 

काश्मीरमध्ये परप्रांतीयांवर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. आता दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. यात दोन मजूर जखमी झाले आहेत. खरे तर सुरुवातील, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा गॅसचा स्फोट नसून दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिली माहिती - या दहशतवादी हल्ल्यात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळापळ करत होते. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर केलेल्या तपासात, दहशतवाद्यांनी परप्रांतीयांवर ग्रेनेडने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोन मजूर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अगलर जैनापोरा भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

बडगाममध्ये स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला -बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर गुरुवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 1 मजुराचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला श्रीनगर येथील SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचास सुरू आहेत.

हा हल्ला बडगाममधील मगरेपोरा चडूरा भागात झाला होता. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश,  असल्याचे सांगण्यात येते. तो बिहारचा रहिवासी होता. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अथवा काश्मीर बाहेरील हिंदूंवरील हल्ले वाढले आहे.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादPoliceपोलिस