Jammu-Kashmir Terrorist Attack: "आता सगळे मरणार", कुलगाममध्ये हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर फारुख अब्दुलांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:11 PM2022-05-31T16:11:50+5:302022-05-31T16:12:13+5:30

Jammu-Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी आज एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

Jammu-Kashmir Terrorist Attack: Controversial statement by Farooq Abdul after terrorist killed Hindu teacher in Kulgam | Jammu-Kashmir Terrorist Attack: "आता सगळे मरणार", कुलगाममध्ये हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर फारुख अब्दुलांचे वादग्रस्त वक्तव्य

Jammu-Kashmir Terrorist Attack: "आता सगळे मरणार", कुलगाममध्ये हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर फारुख अब्दुलांचे वादग्रस्त वक्तव्य

Next

Jammu-Kashmir Terrorist Attack:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी आज एका हिंदू महिला शिक्षिकेची हत्या केली आहे. शाळेत घुसून सर्वांसमोर महिलेवर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे आधीच परिसरात भीतीचे वातावरण पसरेल आहे. पण, या घटनेवरुन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. 

फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भरदिवसा शाळेत घुसून एका हिंदू शिक्षिकेची हत्या करण्यात आली. रजनी बाला असे या महिलेचे नाव आहे. या हत्येवर प्रश्न विचारला असता अब्दुल्ला म्हणाले की, 'आता सर्व मारले जातील.' त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ते मीडियासमोरून जाताना हे वक्तव्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सामान्य जनता फारुख अब्दुल्ला यांच्यावर नाराज आहे. 

राहुल भटचा खून
दोन ते तीन आठवड्यांपूर्वी काश्मीरच्या बडगाममध्ये 12 मे 2022 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या  दहशतवाद्यांनी एका सरकारी कार्यालयात घुसून हल्ला केला होता. यात राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राहुल भट स्थलांतरित काश्मिरी हिंदूंच्या रोजगारासाठी दिलेल्या विशेष पॅकेजसाठी काम करत होते. आधी राहुल भट आणि आता रजनी बाला यांच्या दिवसा ढवळ्या झालेल्या हत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Web Title: Jammu-Kashmir Terrorist Attack: Controversial statement by Farooq Abdul after terrorist killed Hindu teacher in Kulgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.