Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. लष्कराचे ‘कॅस्पर’ (सैन्य वाहन) सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने १० जवान शहीद झाले, असून इतर जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
भद्रवाह-चंबा मार्गावर अपघात
प्राथमिक माहितीनुसार, लष्कराचे हे वाहन डोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा रोड मार्गावरून जात होते. अपघातावेळी या ‘कॅस्पर’ वाहनात एकूण १७-२० जवान प्रवास करत होते. ते सर्वजण एका उंच पर्वतीय पोस्टकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झाला.
बचावकार्य वेगाने सुरू
घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातून जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. जखमी सैनिकांना घटनास्थळी तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी उधमपूर येथे विमानाने हलवण्यात आले. जखमींपैकी किमान तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपास सुरू
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, रस्त्याची अवस्था आणि हवामान यासह सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.
या दुर्दैवी अपघाताबाबत जम्मू-काश्मीरच्या उप-राज्यपालांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, डोडा येथे झालेल्या अपघातात आपल्या भारतीय लष्कराच्या १० शूर जवानांना हौतात्म्य आले. या जवानांची उत्कृष्ट सेवा आणि सर्वोच्च बलिदान आम्ही नेहमीच स्मरणात ठेवू. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश संबंधित कुटुंबांसोबत एकजुटीने उभा आहे. १० जखमी जवानांना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
दोडाची परिस्थिती अजूनही संवेदनशील
दोडा जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यात डोंगराळ आणि जंगली भाग जास्त असल्याने, परिसरात सतत दहशतवादी कारवाया सुरू असतात. गुप्तचर अहवालांनुसार, दोडा आणि शेजारच्या किश्तवार जिल्ह्यात ३०-३५ पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या भागात भारतीय सैन्याची सतत गस्त सुरू असते.
Web Summary : A tragic accident in Doda, Jammu & Kashmir, claimed the lives of four soldiers. An army vehicle plunged into a 200-foot gorge, injuring twelve others. The incident occurred on the Bhadarwah-Chamba road while the soldiers were en route to a high-altitude post. Rescue operations are underway, and an investigation has begun.
Web Summary : जम्मू-कश्मीर के डोडा में एक दुखद हादसे में चार जवान शहीद हो गए। एक सेना वाहन 200 फीट गहरी खाई में गिर गया, जिसमें बारह अन्य घायल हो गए। यह घटना भद्रवाह-चंबा मार्ग पर हुई जब सैनिक एक ऊंची चौकी पर जा रहे थे। बचाव कार्य जारी है, और जांच शुरू कर दी गई है।