Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! शोपियान चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 09:05 IST2023-10-10T08:56:28+5:302023-10-10T09:05:14+5:30
Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे आज पहाटे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! शोपियान चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे आज पहाटे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोमवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पूर्ण ताकदीने याचा सामना केला. काश्मीर पोलीस झोनने अलशीपोरा येथील चकमकीची माहिती ट्विटरवर एका पोस्टद्वारे दिली होती. चकमकीनंतर जवानांकडून शोधमोहीम सुरू आहे. याआधी कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
गेल्या बुधवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी मारले गेले. पोलिसांनी ही माहिती दिली होती. बासित अमीन भट आणि साकिब अहमद लोन अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दोघेही कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.
Shopian Encounter Update: Killed terrorists have been identified as Morifat Maqbool and Jazim Farooq alias Abrar of terror outfit LeT. Terrorist Abrar was involved in the killing of Kashmiri Pandit late Sanjay Sharma: ADGP Kashmir
— ANI (@ANI) October 10, 2023
एका पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कुज्जरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर चकमक सुरू झाली.
अधिकारी म्हणाले की, कारवाईदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्याला प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले असून, घटनास्थळावर त्यांचे मृतदेह सापडल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
घटनास्थळावरून कागदपत्रं, शस्त्र आणि काडतुसं आणि एके सिरीजच्या दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी हे मोठे यश असल्याचं म्हटलं आणि पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाचे अभिनंदन केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.