शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 19:09 IST

या भुयारापासून पाकिस्तानची सीमा चौकी गुलजार जवळपास ७०० मीटर लांब आहे.

ठळक मुद्देभुयारात सापडलेल्या वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कराची आणि शकरगढ असे लिहिले आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये भारत -पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मोठे भुयार सापडले आहे. याबाबतची माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, भुयार सापडल्यानंतर या परिसरात जवानांनी मोठी शोधमोहीम सुरु केली आहे. तसेच, दहशतवादी कारवयांसाठी, घुसखोरी, अंमली पदार्थ, शस्त्रांची तस्करी करण्यासाठी या भुयाराचा वापर केल्याचा अंदाज असून भुयारात काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील सांबा सेक्टरमध्ये गुरुवारी गस्तीवर असणाऱ्या बीएसएफच्या जवानांना भुयार सापडले. हे भुयार जवळपास २० मीटर लांबीचे आहे.  या भुयारात वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या आहेत. यावर पाकिस्तानी शिक्के आहेत. दहशतवादी कारवायांसाठी आणि घुसखोरी करण्यासाठी हे खोदले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

 

याचबरोबर, भुयारात सापडलेल्या वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कराची आणि शकरगढ असे लिहिले आहे. तसेच, या पिशव्यांवर, त्या बनविल्याची आणि एक्सपायरीची तारीख सुद्धा आहे. त्यामुळे या पिशव्या नुकत्याच तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय, भुयारापासून पाकिस्तानची सीमा चौकी गुलजार जवळपास ७०० मीटर लांब आहे.

विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या पंजाबमध्ये नुकतेच पाच सशस्त्र घुसखोरांच्या मृत्यूनंतर बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर शोध मोहीम राबविली आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या जवळपास ३३०० किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी बीएसएफकडे आहे. यापूर्वी सीमेवरील जम्मूच्या भागात बोगदे सापडले होते.

आणखी बातम्या...

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBorderसीमारेषाIndian Armyभारतीय जवान