जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक पाकिस्तानी सैनिक ठार

By Admin | Updated: October 21, 2016 15:52 IST2016-10-21T11:28:14+5:302016-10-21T15:52:09+5:30

हीरानगर सेक्टरमधील बोबिया पोस्टजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, या गोळीबाराला जवानांनी जशास तसे उत्तर दिले.

Jammu Kashmir re-arms violation, one Pakistani soldier killed | जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक पाकिस्तानी सैनिक ठार

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक पाकिस्तानी सैनिक ठार

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि 21 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. हीरानगर सेक्टरमधील बोबिया पोस्टजवळ पाकिस्तानकडून आज सकाळी गोळीबार सुरू करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. तर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला ठार केले. तब्बल 15 तासांपासून दोन्ही बाजूंनी हा गोळीबार सुरू होता. 
 
'पाकिस्तानकडून रात्रभर सुरू असलेल्या तोफांचा मारा पहाटे 3.30 वाजता थांबला. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबाराला आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले,' अशी माहिती लष्काराच्या प्रवक्त्याने दिली आहे. दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्नही भारतीय जवानांनी उधळून लावला होता. 
 
सर्जिकल स्ट्राईक झाल्यापासून पाकिस्तानकडून आतापर्यंत 30 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. तेव्हापासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती सुरूच आहे. 
 

Web Title: Jammu Kashmir re-arms violation, one Pakistani soldier killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.