कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुरक्षेच्या कारणास्तव 71 शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:59 IST2018-02-01T14:50:47+5:302018-02-01T14:59:49+5:30
सीमेरेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याने गुरूवारी (1 फेब्रुवारी ) लॅम परिसरातील एकूण 71 शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत.

कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुरक्षेच्या कारणास्तव 71 शाळा बंद
श्रीनगर : सीमेरेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याने गुरूवारी (1 फेब्रुवारी ) लॅम परिसरातील एकूण 71 शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे राजौरीचे उपायुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी सांगितले.
झांगर, धामका आणि कलाल परिसरातील पाच गावांना टार्गेट करत पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार पाहता सीमावर्ती भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मंगळवारी नियंत्रण रेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्याने तोफगोळे डागण्यात आले होते. भारतीय सैन्य दलाकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire in Nowshera sector of Rajouri district
— ANI (@ANI) February 1, 2018