शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 4:40 PM

पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केल्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा धुमश्चक्री सुरू झाली आहे.

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केल्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा धुमश्चक्री सुरू झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळी सुंदरबनी क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला असून, या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर प्रत्युत्तरदाखल भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले आहेत. आज पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना सुंदरबनी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. या गोळाबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले. सुंदरबनीबरोबरच तंगधर आणि केरन विभागामध्येही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात आला. 

दरम्यान,  तंगधर आणि केरन विभागात भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तान