शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir News : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून आणखी एक निरपराधाची हत्या; २४ तासांतील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 23:17 IST

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये एका दुकानात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा झाला मृत्यू.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची नापाक कारवाई पुन्हा एकदा समोर आली आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारात बोहरी कदल परिसरात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या एका सेल्समनची गोळी घालून हत्या केली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मग इब्राहिम असं असून तो बांदीपुराचा रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मृत व्यक्ती काश्मीरी पंडित संदीप मावा यांच्याकडे सेल्समनचं काम करत होता. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना मुस्लीम जनबाज फोर्सनं (Muslim Janbaaz Force) घेतली आहे. संदीप मावा आणि त्यांचे वडील हे सरकारी एजन्सींसाठी काम करत होते. तसंच ते मूळ काश्मीरी नसलेल्या लोकांना काश्मीरमध्ये स्थायिक करण्याचे प्रयत्न करत होते, असं दहशतवादी संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

चार गोळ्या लागल्या७० सालानंतर पंडित रोशन लाल मावा यांनी २०१९ मध्ये काश्मीर खोऱ्यात आपला मसाल्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला होता. जैना कदल येथील प्रसिद्ध व्यवसायिक रोशन लाल मावा यांच्या दुकानाबाहेर दहशतवाद्यांनी कथितरित्या ऑक्टोबर १९९०मध्ये हल्ला केला होता. यामध्ये त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. आता सोमवारी त्यांच्या मुलाकडे असलेल्या सेल्समनची हत्या करण्यात आली. यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच इब्राहिम याची करण्यात आलेल्या हत्येची घटना ही नींदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. यापूर्वी रविवारी श्रीनगरच्या बटमालू क्षेत्रात दहशतवाद्यानं एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. तौसिफ अहमद हे बटमालू येथे PCR च्या पोस्टिंगवर होते. हल्ल्यानंतर त्वरित त्यांना नजीकच्या SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला