जम्मू काश्मीर - जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

By Admin | Updated: November 7, 2016 09:20 IST2016-11-07T08:40:09+5:302016-11-07T09:20:54+5:30

जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीदम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. तर हिजबूल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.

Jammu Kashmir - A militant in the jawans and terrorists, a terrorist killed | जम्मू काश्मीर - जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर - जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 7 - जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीदम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. तर हिजबूल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मध्यरात्री सुरु झालेली ही चकमक अद्याप सुरु आहे. 
 
शोपियन जिल्ह्यातील वनगम गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवादी आणि 62 राष्ट्रीय रायफल्स, पोलीस यांच्यात चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Jammu Kashmir - A militant in the jawans and terrorists, a terrorist killed