शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Jammu Kashmir: 'जम्मू-काश्मीरला प्रेम हवंय, पण मिळाला भाजपचा बुलडोझर', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 20:01 IST

Jammu Kashmir News: राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर टीका केली.

Jammu Kashmir Anti-Encroachment Drive: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (12 फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार म्हणाले की, या केंद्रशासित प्रदेशाला रोजगार, व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्याऐवजी "भाजपचा बुलडोझर" मिळाला आहे. 

7 जानेवारी रोजी महसूल विभागाचे आयुक्त सचिव विजय कुमार बिधुरी यांनी सर्व उपायुक्तांना जम्मू-काश्मीरमधील 100 टक्के अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून, जम्मू आणि काश्मीरमधील 10 लाख कनाल (एक कनाल = 605 चौरस यार्ड) पेक्षा जास्त जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या प्रमुख राजकीय पक्षांनी या मोहिमेविरोधात आवाज उठवला असून, तातडीने ही कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. 

राहुल गांधींचे ट्विट एका ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरला रोजगार, उत्तम व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्यांना काय मिळाले? भाजपचा बुलडोझर. तेथील लोकांची अनेक दशके कष्टाने सिंचन केलेली जमीन हिसकावली जात आहे. त्यांना. शांती आणि काश्मीच्या लोकांची रक्षा एकत्र येण्याने होईल, तोडल्याने नाही.'' राहुल गांधी यांनी एका मीडिया वृत्तालाही टॅग केले ज्यात दावा करण्यात आला होता की या मोहिमेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनीही विरोध केलाया अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात जम्मू-काश्मीरमध्येही बरीच निदर्शने होत आहेत. बुधवारी (8 फेब्रुवारी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही निषेध मोर्चा काढला. जम्मू-काश्मीरमध्ये गुंडा राज असल्याचा आरोप त्यांनी केला. तर, जेके डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद बुधवारी अतिक्रमण विरोधी मोहिमेवरुन म्हणाले की, केंद्राने कलम 370 आणि 35A रद्द केल्याबद्दलचा संताप कमी झाला होता. पण, या मोहिमेने (अतिक्रमणविरोधी मोहीम) अधिक नुकसान केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरEnchroachmentअतिक्रमणBJPभाजपाcongressकाँग्रेस