शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:45 IST

Jammu Kashmir Election Results 2024 : डोडा विधानसभेतील पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवल्याबद्दल देशभरातील आपच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे अभिनंदन, असे आपने ट्विटद्वारे म्हटले आहे.

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने (आप) डोडा विधानसभेच्या निकालाने धक्का दिला आहे. डोडा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आपने विजय मिळवला आहे. आपने आपल्या एक्सवर पोस्ट करत या मतदारसंघातील उमेदवाराचे अभिनंदन केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झाडू चालला. डोडा विधानसभेतील पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवल्याबद्दल देशभरातील आपच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे अभिनंदन, असे आपने ट्विटद्वारे म्हटले आहे.

डोडा विधानसभेतून आपचे उमेदवार मेहराज मलिक चार हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनीही मेहराज मलिक यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी एक्सवर मेहराज मलिक यांचे अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे. दोडा येथील आपचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपचा पराभव करून नेत्रदीपक विजय मिळविल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही निवडणूक चांगली लढवली. पाचव्या राज्यात आमदार झाल्याबद्दल संपूर्ण आपचे अभिनंदन, असे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत मेहराज मलिक?मेहराज मलिक हे डोडा भागातील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. आपल्या नम्र पार्श्वभूमीमुळे आणि लोकांशी जोडले गेल्यामुळे त्यांनी डोडामध्ये गेल्या काही वर्षांत एक मजबूत जनाधार तयार केला आहे. मात्र, मेहराज मलिक यांचा विजय हा मोठा उसफेर मानला जात आहे, कारण डोडा हा प्रदेश परंपरागतपणे मुख्य प्रवाहातील पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. भ्रष्टाचाराशी लढा, सुशासन आणि जनतेची सेवा करण्यावर मेहराज मलिक यांचा भर असल्यामुळे त्यांना स्थानिक मतदारांचा पाठिंबा मिळाला.

मेहराज मलिक यांना २२९४४ मतं निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मेहराज मलिक यांना २२९४४ मतं मिळाली असून ते भाजपच्या गजयसिंह राणा यांच्यापेक्षा १७७० मतांनी आघाडीवर आहेत. गजयसिंह राणा यांना १८१७४ मते मिळाली आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे खालिद नजीब सुहरवर्दी ९९६९ मतांनी पिछाडीवर आहेत. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती ९० जागांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीवर आहे आणि निवडणूक आयोगाच्या मते, युती ४८ जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने नऊ जागांचे निकाल जाहीर केले आहेत, त्यापैकी गुरेझ, हजरतबल आणि जदीबल या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपjammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४