जम्मू काश्मीर - सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, 8 जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 19:24 IST2016-06-25T18:35:33+5:302016-06-25T19:24:19+5:30

पंपोर येथे फायरिंग रेंजवर सराव करुन सीआरपीएफ जवान परतत असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहेत

Jammu Kashmir - CRPF jawans have been attacked, 8 jawans martyrs | जम्मू काश्मीर - सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, 8 जवान शहीद

जम्मू काश्मीर - सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, 8 जवान शहीद

ऑनलाइन लोकमत - 
जम्मू काश्मीर, दि. 25 - पंपोर येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 वान शहीद झाले आहेत. 17 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांना सीआरपीएफ जवानांनी दिलेल्या उत्तरात 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 
 
फायरिंग रेंजवर सराव करुन सीआरपीएफ जवान परतत असताना त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 8 वान शहीद झाले असून 17 जखमी झाले आहेत अशी माहिती सीआरपीएफ कमांडंट राजेश यादव यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिलं ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचंही राजेश यादव यांनी सांगितलं आहे.
 
दोन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघेही दहशतवादी आत्मघाती होते, तसंच लष्कर या दहशतवादी संघटनेचे असण्याची शक्यता असल्याचं सीआरपीएफच्या आयजींनी सांगितलं आहे.
 
 

Web Title: Jammu Kashmir - CRPF jawans have been attacked, 8 jawans martyrs