शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:28 IST

'जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले.'

Jammu-Kashmir Article 370: आज राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंवर निशाणा साधला. शहा यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, जर अवेळी युद्धविराम झाला नसता, तर आज पीओकेची घटना घडली नसती. जवाहरलाल नेहरू दोन दिवस थांबले असते, तर संपूर्ण पीओके तिरंग्याखाली आला असता.

सत्य बाहेर येतेच...कलम 370 वर बोलताना अमित शहा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर हैदराबादमध्ये काश्मीरपेक्षाही मोठी समस्या होती, नेहरू तिथे गेले नाहीत. नेहरू जुनागड, लक्षद्वीप, जोधपूर येथे गेले नाहीत. त्यांनी फक्त काश्मीरचे काम पाहिले आणि तेही अर्धवट सोडले. काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर का झाला? इतिहास 1000 फूट खाली गाडला गेला तरी सत्य बाहेर येते.

विलीनीकरणादरम्यान एका व्यक्तीला विशेष स्थान देण्याची विनंती करण्यात आली होती आणि ती म्हणजे शेख अब्दुल्ला, त्यामुळे विलिनीकरणाला विलंब झाला. एवढ्या राज्यांचे विलीनीकरण झाले, पण कुठेही कलम 370 का लागू केले नाही. ही अट कोणी घातली आणि ती कोणी मान्य केली, याचे उत्तर देशातील जनतेला द्यावे लागेल. या प्रश्नापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, अशी टीका शहांनी केली.

सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी सैन्य पाठवले...1947 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार वल्लभभाई पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले. हे मी म्हणत नाहीय, तर नेहरू मेमोरिअलमधील पुस्तकात नेहरुंनीच काश्मीरमध्ये झालेली चूक मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्रात जाण्याची चूक त्यांनी केली. चुकीच्या कलमाखाली संयुक्त राष्ट्रात गेले, त्यामुळे नुकसान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये ठराविक कुटुंबं सरकार चालवत होती, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हा हिंदू-मुस्लिमचा विषय नाहीकाँग्रेसवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, पराभवात विजय शोधण्याची कला काँग्रेसकडून शिकली पाहिजे. आज सुप्रीम कोर्टाने कलम 370 हटवल्याचा निर्णय योग्य ठरवला, पण काँग्रेस तो निर्णय चुकीचा ठरवत आहे. काँग्रेसला वास्तव समजून घ्यावे लागेल, हा हिंदू-मुस्लिमाचा विषय नाही. काश्मीरपेक्षा गुजरात, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, पण तिथे फुटीरतावाद नव्हता. काश्मीरमध्ये कलम 370 असल्यामुळे फुटीरतावाद तयार झाला. फुटीरतावादामुळेच तिथे दहशतवाद फोफावला, असंही शहा यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेस