शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी लष्कर-ए-तोयबा व  हिजबुल मुजाहिद्दीन घेताहेत 'जैश-ए-मोहम्मद'ची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 08:28 IST

भारतीय लष्कराकडून हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील टॉपच्या कमांडर मारले गेल्यानंतर आता दहशतवादी टोळींचे म्होरके 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेची मदत घेत आहेत, असा दावा जम्मू काश्मीर पोलिसांकडून करण्यात आला आहे.

श्रीनगर, दि. 28 - भारतीय लष्कराकडून हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील टॉपच्या कमांडर मारले गेल्यानंतर आता दहशतवादी टोळींचे म्होरके 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेची मदत घेत आहेत, असा दावा जम्मू काश्मीर पोलिसांकडून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर आपले टॉपच्या कमांडरचा खात्मा होत असल्याच्या निराशेतून काश्मीर खो-यात अनेक ठिकाणी ते दहशतवादी हल्लेदेखील घडवून आणत आहेत. पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत शनिवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झालेत. हुतात्म्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 3 दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. 

'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेकडून मोठ्या प्रमाणात आत्मघातकी हल्ले केले जातात आणि गेल्या काही वर्षांमध्ये ही संघटना काश्मीरच्या उत्तरेकडील भागातही सक्रीय आहे. दरम्यान, ही संघटना आता काश्मीर खो-यात आपले हात-पाय पसरवत असल्याचे दिसत आहे.  काश्मीर पोलीसचे आयजी मुनीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाचे टॉपचे कमांडर्सचा खात्मा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवायांसाठी आता जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेची मदत घेतली जात आहे. खान यांनी असेही सांगितले की, दक्षिण काश्मीर विशेषतः त्राल, पुलवामा आणि शोपियान परिसरात जैश-ए-मोहम्मदच्या सक्रीय दहशतवाद्यांची संख्या जवळपास 10-12 एवढी असावी. दरम्यान या जैश-ए-मोहम्मदकडून अशा प्रकारचे हल्ले 1990 सालापासून होत आहेत. 

शनिवारी पहाटे सुरू झालेली चकमक संध्याकाळी संपलीपुलवामा जिल्हा मुख्यालय पोलीस वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबांसह राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर अतिरेक्यांनी हल्ला केला नाही वा कुटुंबीयांपैकी कोणाला ओलीसही ठेवले नाही. सुरुवातीला दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक अतिरेकी सकाळीच ठार झाला. संध्याकाळी गोळीबार पूर्णत: थांबला, तेव्हाच अतिरेक्यांची संख्या तीन होती, हे स्पष्ट झाले.पाकच्या तीन रेंजर्सचा खात्माजम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या पडगवाल भागात गोळीबार केला. तथापि, सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने सांगितले.धनावडे यांच्या निवृत्तीला शिल्लक होते केवळ आठ महिनेकाश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. निवृत्तीला अवघे सात महिने उरले असताना धनावडे यांना वीरमरण आले. सैन्य दलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मोहोट येथील धनावडे कुटुंबीयांना ते शहीद झाले असल्याचे कळवायला पोलीस लगेच रवाना झाले. रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र धनावडे हे मार्च २०१८ मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

 

टॅग्स :Terrorismदहशतवाद