पाकिस्तानकडून पाणी पिणाऱ्या बीएसएफ जवानावर गोळीबार, प्रत्युत्तरात 3 रेंजर्सचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 07:56 AM2017-08-27T07:56:28+5:302017-08-27T07:59:20+5:30

पाकिस्तानी सैन्याचं पुन्हा एकदा संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.

bsf jawan drinking water pakistan sniped 3 pak rangers killed | पाकिस्तानकडून पाणी पिणाऱ्या बीएसएफ जवानावर गोळीबार, प्रत्युत्तरात 3 रेंजर्सचा खात्मा

पाकिस्तानकडून पाणी पिणाऱ्या बीएसएफ जवानावर गोळीबार, प्रत्युत्तरात 3 रेंजर्सचा खात्मा

Next
ठळक मुद्देपाकिस्तानी सैन्याचं पुन्हा एकदा संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी रेंजरने बीएसएफच्या जवानावर लपून गोळीबार केला.

श्रीनगर, दि. 27 - पाकिस्तानी सैन्याचं पुन्हा एकदा संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी रेंजरने बीएसएफच्या जवानावर लपून गोळीबार केला. पाणी पित असताना बीएसएफ जवानावर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला. जवानाच्या कानाजवळ गोळी लागल्याने यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. भारतीय जवानांनीही पाकिस्तानच्या या भ्याड गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या तीन रेंजर्सचा खात्मा केला. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार जखमी जवानाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती आहे. 
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, आठ जवान शहीद, सातारच्या रवींद्र धनावडेंना वीरमरण-
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झाले. हुतात्म्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांचाही समावेश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही अतिरेक्यांना ठार केले आहे.
अलीकडील काळातील हा काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. हे तिन्ही दहशतवादी परदेशी होते, असे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यात इतके जवान व पोलीस हुतात्मा होणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान मरण पावले, तर आॅपरेशन पूर्ण झाल्यानंतर अतिरेक्यांनी टाकलेले बॉम्ब निकामी करताना दोघांना मरण आले.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अतिरेकी पोलीस वसाहत असलेल्या भागात घुसले. त्या कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांची अनेक घरे व पोलिसांची कार्यालये आहेत. अतिसुरक्षित म्हणून ओळखला जाणारा व कडेकोट बंदोबस्त असलेला हा भाग आहे. अशा ठिकाणी हे दहशतवादी कसे घुसले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ते गोळीबार करीतच कॉम्प्लेक्समध्ये घुसले. पोलिसांच्या इमारतीतून त्यांनी बाहेरच्या दिशेने ग्रेनेडही फेकले. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व पोलीस जखमी झाले. पहाटे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सारेच काहीसे गोंधळून गेले. मात्र लगेच जवान व पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यात एक दहशतवादी मारला गेला. हे आॅपरेशन १५ तास चालले. त्यानंतर तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
चकमक संध्याकाळी संपली
त्या वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबांसह राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर अतिरेक्यांनी हल्ला केला नाही वा कुटुंबीयांपैकी कोणाला ओलीसही ठेवले नाही.सुरुवातीला दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक अतिरेकी सकाळीच ठार झाला. संध्याकाळी गोळीबार पूर्णत: थांबला, तेव्हाच अतिरेक्यांची संख्या तीन होती, हे स्पष्ट झाले.
पाकच्या तीन रेंजर्सचा खात्मा
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या पडगवाल भागात गोळीबार केला. तथापि, सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाºयाने सांगितले.
धनावडे यांच्या निवृत्तीला शिल्लक होते केवळ आठ महिने
सातारा : काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. निवृत्तीला अवघे सात महिने उरले असताना धनावडे यांना वीरमरण आले.
सैन्य दलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मोहोट येथील धनावडे कुटुंबीयांना ते शहीद झाले असल्याचे कळवायला पोलीस लगेच रवाना झाले.
रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र धनावडे हे मार्च २०१८ मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 
 

Web Title: bsf jawan drinking water pakistan sniped 3 pak rangers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.