Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:09 IST2025-11-08T13:06:52+5:302025-11-08T13:09:28+5:30
Eagle Hits Train Windscreen: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे धावत्या ट्रेनला गरुडाने धडक दिल्याने पायलट जखमी झाल्याची माहिती समोर आली.

Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका वेगळ्या घटनेची नोंद झाली. बारामुल्ला-बनिहाल मार्गावर धावणाऱ्या एका ट्रेनच्या विंडस्क्रीनला एका गरुडाने जोराची धडक दिली, या अपघातात लोको पायलटच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ आवश्यक ती कारवाई केली.
STORY | Anantnag, Jammu and Kashmir: Train pilot injured as eagle shatters windscreen and lands inside cabin
— Press Trust of India (@PTI_News) November 8, 2025
An eagle crashed into the windscreen of a train in Anantnag district of Jammu and Kashmir and landed inside the cabin of the locomotive pilot who received minor injuries,… pic.twitter.com/afEw9BnxGj
पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बिजबेहरा आणि अनंतनाग रेल्वे स्थानकांदरम्यान धावणाऱ्या बारामुल्ला-बनिहाल ट्रेनमध्ये घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रेनच्या समोर अचानक हा गरुड आला आणि थेट ट्रेनच्या समोरील काचेवर आदळला. गरुडाच्या धडकेमुळे विंडस्क्रीन तुटली आणि लोको पायलटच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. त्यावेळी लोको पायलटने प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.