कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला केलं लक्ष्य; एकाचा मृत्यू, पत्नी व मुलगी रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:16 IST2025-02-03T17:29:00+5:302025-02-03T18:16:09+5:30

कुलगाममध्ये एका निवृत्त सैनिकाच्या कुटुंबावर दहशतवादी हल्ल्या केल्याची घटना समोर आली आहे.

Jammu and Kashmir Terrorists opened fire in Kulgam former soldier killed | कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला केलं लक्ष्य; एकाचा मृत्यू, पत्नी व मुलगी रुग्णालयात

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला केलं लक्ष्य; एकाचा मृत्यू, पत्नी व मुलगी रुग्णालयात

Kulgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या कुटुंबांना लक्ष्य केलं जात आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये एका निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला लक्ष्य केले. या दहशतवादी हल्ल्यात एक निवृत्त सैनिक, त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

कुलगाम जिल्ह्यात सोमवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माजी लष्करी जवान मंजूर अहमद वागे यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगी या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग भागात दहशतवाद्यांनी मंजूर अहमद वागे आणि त्यांच्या पत्नीवर घराजवळ गोळ्या झाडल्या आणि तिघेही जखमी झाले. यानंतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंजूर अहमद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मंजूर अहमद यांच्यावरील हल्ल्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांना जवळच्या रुग्णालयात नेले.  डॉक्टरांनी मंजूर अहमद वागे यांना मृत घोषित केले. त्यांची पत्नी व मुलीवर उपचार सुरू आहेत.  मंजूर अहमद यांच्या पोटात गोळी लागली होती. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलीच्या पायाला गोळी लागली. या दोघांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. यापूर्वीही काश्मीरमध्ये राहणाऱ्या निवृत्त सैनिकांना दहशतवाद्यांनी अनेकदा लक्ष्य केले आहे.

दरम्यान, रविवारी सुटी संपवून घरी परतणारा एक जवान जम्मू-काश्मीरमध्ये बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. रायफलमॅन आबिद भट शनिवारी अनंतनाग जिल्ह्यातील चित्तरगुल येथील आपल्या घरातून रंगरेथ मिलिटरी कॅम्पमध्ये परतण्यासाठी निघाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भट शनिवारी सकाळपर्यंत कॅम्पमध्ये पोहोचले नव्हते. यानंतर त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. 
 

 

Web Title: Jammu and Kashmir Terrorists opened fire in Kulgam former soldier killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.