शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir : PDP नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला, PSO चा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 14:08 IST

Jammu and Kashmir : दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद्यांनी पीडीपी नेत्याच्या घरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पीडीपी नेत्याचे सुरक्षा रक्षक (पीएसओ) गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतंं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील नाटीपोरा भागात सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) नेता हाजी परवेज यांच्या घरावर हल्ला केला. यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक मंजूर अहमद गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. "माझी मुलं, वृद्ध आई आणि अन्य कुटुंबीय घरात होते. तेव्हा सकाळी दोन हल्लेखोर मुख्य दरवाज्यातून आत आले."

"दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. यानंतर पीएसओकडून देखील गोळीबार सुरू करण्यात आल्यावर हल्लेखोरांनी पळ काढला" अशी माहिती परवेज यांनी दिली आहे. याआधी जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं

सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. पूंछच्या दुर्गन पोशणा भागात रविवारी दुपारपासून दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू होती. त्यानुसार कारवाई दरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.  दहशतवाद्यांच्या एक गटाने गेल्या तीन दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधून पूंछमध्ये घुसखोरी केली आहे आणि ते शोपियानच्या दिशेने निघाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शुक्रवारपासून सुरक्षा दल या दहशतवाद्यांचा मागोवा घेत आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी