जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट करत त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पहलगाम हा असाच एक भाग आहे जिथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडो पर्यटक येथे येतात.
पहलगाममधील पर्वतावर ट्रेकिंगसाठी पर्यटक जातात. हा दहशतवादी हल्ला तिथेच झाला असल्याची माहिती मिळत आहे. लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन पर्यटकांना गोळी लागली आणि ते जखमी झाले. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
या हल्ल्याबद्दल एबीपी न्यूजशी बोलताना माजी डीजीपी म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा चिंताजनक आहे कारण अमरनाथ यात्रा काही दिवसांत सुरू होणार आहे आणि तिचा बेस कॅम्प पहलगाममध्येच आहे. शिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. बहुतेक दहशतवादी पर्यटकांवर हल्ला करत नाहीत, कारण याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या व्यवसायावरही होतो.