अवंतीपोरा - जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. अवंतीपोरा येथे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या छुप्या अड्ड्यावर छापा टाकला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.“सीर / पस्तोना येथील जंगलात दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी 42 RR आणि 180 Bn CRPF यांच्यासमवेत या भागात शोधमोहीम सुरू केली. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा उधळून लावला आणि त्यानंतर तेथे वाढलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या, "जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
मोठं यश! हिजबुल मुजाहिद्दीनचा छुपा अड्डा जम्मू - काश्मीर पोलिसांनी केला उद्ध्वस्त
By पूनम अपराज | Updated: March 3, 2021 17:36 IST
Jammu and Kashmir police busted Hizbul Mujahideen terror hideout : बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा उधळून लावला आणि त्यानंतर तेथे वाढलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या, "जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्ध केलेले पत्रकात ही माहिती दिली आहे.
मोठं यश! हिजबुल मुजाहिद्दीनचा छुपा अड्डा जम्मू - काश्मीर पोलिसांनी केला उद्ध्वस्त
ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, या लपण्याच्या ठिकाणाचा आकार अंदाजे 5 feetx7 feetx4 feet आहे. या छुप्या ठिकाणाहून हिजबुल मुजाहिद्दीनचे बेकायदा साहित्य आणि भांडी, अन्नासहित इतर साहित्य जप्त केले आहे.