शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 21:23 IST

मेहबूबा मुफ्ती यांचं राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र

श्रीनगर: पीडीपीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं पत्र पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलं आहे. मात्र यावरुन पीडीपीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. पीडीपीचे आमदार इमरान अन्सारीदेखील राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. आपल्यासोबत 18 आमदार असल्याचा दावा अन्सारी यांनी केला आहे. मार्च 2015 मध्ये भाजपा आणि पीडीपीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र यावर्षीच्या जून महिन्यात भाजपानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर जवळपास सहा महिने राज्यात राज्यपाल राजवट लागू आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्याला देण्यात आलेला विशेष दर्जा टिकवण्यासाठी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येत असल्याचं मुफ्ती यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला सांगितलं. 'राज्याचा विशेष दर्जा आणि कलम 35 ए याकडे आमचं प्रामुख्यानं लक्ष आहे. हा मुद्दा जानेवारीत उपस्थित झाला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री होते आणि मी याला विरोध केला होता. काश्मिरी जनतेनं यासाठी प्राणांची आहुती दिली आहे. त्यावेळी अनेक बदलांबद्दल चर्चा सुरू होत्या. मात्र ते बदल जनतेच्या हिताचे नव्हते,' असं मुफ्ती यांनी म्हटलं. मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन चिंताजनक असल्याचं मुफ्ती यांनी सांगितलं. 'राज्याचा विशेष दर्जा टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या पीडीपी या आघाडीचं नेतृत्व करेल. मात्र यावर अद्याप पुढील चर्चा व्हायची आहे,' असं त्या म्हणाल्या. नॅशनल कॉन्फरन्स या सरकारमध्ये सहभागी होणार की फक्त बाहेरुन पाठिंबा देणार, या प्रश्नाला थेट उत्तर देणं मुफ्ती यांनी टाळलं. याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही, असं त्यांना सांगितलं. सध्या विधानसभेतलं समीकरण काय?जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एकूण 89 जागा आहेत. यापैकी 2 सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी 44 आमदारांचा पाठिंबा लागतो. सध्या विधानसभेत पीडीपीचे 28, भाजपाचे 25, नॅशनल कॉन्फरन्सचे 15 आणि काँग्रेसचे 12 आमदार आहेत. त्यामुळे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र आल्यास हा आकडा 55 वर जातो.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPDPपीडीपीcongressकाँग्रेसBJPभाजपाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती