LoCवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन,गोळीबारात एक महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 09:02 IST2018-05-04T08:50:13+5:302018-05-04T09:02:59+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.

LoCवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन,गोळीबारात एक महिला जखमी
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर परिसरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्करानंही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
2017 मध्ये सीमारेषेवर एकूण 860, 2016 मध्ये 271 आणि 2015मध्ये एकूण 387 वेळा पाकिस्तानानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार करण्यात येतो. जानेवारी 2018मध्ये पाकिस्तानकडून 150 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.
Pakistan violated ceasefire in Keran sector, last night. Exchange of fire lasted nearly 45 minutes, one civilian injured. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) May 4, 2018