शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : त्राल येथील चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 12:10 IST

दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यावेळीच ही चकमक झाली.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्राल येथे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने रविवारी सकाळी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले.  शनिवारी जम्मू काश्मीरमध्ये एक डीएसपीच्या कारमधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज त्राल येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यावेळीच ही चकमक झाली. त्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले.  गेल्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे. आता दहशतवादी दोन किंवा तीनच्या गटांमध्ये हालचाली करतात. यापूर्वी दहशतवादी  हे  सहा ते सात जणांच्या ग्रुपमधून येत असत.दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चेकिंगदरम्यान एका गाडीतून हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांसोबत गाडीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक (डिएसपी)होते. सुरक्षा दलांनी या पोलीस उपअधीक्षकांना सुद्धा अटक केली आहे.  हे पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेते आहेत.

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक 

सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका?

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले.... दोन दहशतवाद्यांमध्ये सय्यद नवीद मुश्ताक ऊर्फ नवीद बाबू असून ज्याचा नंबर दहशतवाद्यांचा प्रमुख रियाज नायकूनंतर येतो. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आसिफ राथर आहे. या दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेल्या उपअधीक्षकांचे नाव देविंदर सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे. ते एअरपोर्ट सिक्युरिटीसाठी तैनात होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद