PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 01:49 PM2020-01-11T13:49:38+5:302020-01-11T14:12:00+5:30

संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे.

When we get orders to that effect, we'll take appropriate action- Army Chief on PoK | PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

Next

नवी दिल्ली  - नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे. 

 लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या मुकुंद नरवणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेण्याविषयी राजकीय नेतृत्वाने केलेल्या विधानाबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, ''संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे. जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू,''  


यावेळी लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेविषयीसुद्धा माहिती दिली. ''लष्कर नियंत्रण रेषेवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. आम्हाला रोज विविध प्रकारची गोपनीय माहिीत मिळत असते. अशा माहितीची गंभीर दखल घेतली जाते. असा सतर्कतेमुळेच BAT या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीच्या कारवाया हाणून पाडण्यात आम्हाला यश मिळाले आहे,''असे त्यांनी सांगितले.
 



आता पूर्वीच्या तुलनेत भारतीय लष्कराची तयारी चांगली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती आणि सैनिकी व्यवहार विभागाची निर्मिती एकिकरणाच्या दिशेने टाकण्यात आलेले मोठे पाऊल आहे. आता ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे लष्करप्रमुख म्हणाले. तसेच पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर लष्कराचे संतुलन करण्याची आवश्यकता असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले.   

Web Title: When we get orders to that effect, we'll take appropriate action- Army Chief on PoK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.