शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 13:27 IST

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये त्रालमध्ये जवानांना मिळालं मोठ यश अवंतीपोरामध्ये झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा झाकिर मुसाचा जवळील दहशतवादी ठार झाल्याची शक्यता घटनास्थळावरुन दारूगोळा जप्त

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. आताही परिसरात चकमक सुरू असल्याची माहिती आहे. संपूर्ण परिसराला जवानांनी घेराव घालत येथे शोधमोहीम सुरू केली आहे.  

ठार करण्यात आलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते, याची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, अवंतीपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. त्रालमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई राबवली. 

यादरम्यान, सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीनंतर घटनास्थळावरुन दारूगोळादेखील जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीमध्ये झाकिर मुसाचा अतिशय जवळचा मानला जाणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यातही पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.  

 

 

 

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातील केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी केलेल्य गोळीबारात दोन भारतीय लष्करी अधिकारी शहीद झाले. या घटनेत ज्युनिअर कमिशण्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एक अधिकाऱ्यानं रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला