पान बहारने जेम्स बाँडला गंडवलं
By Admin | Updated: October 21, 2016 13:38 IST2016-10-21T13:00:02+5:302016-10-21T13:38:26+5:30
'पान बहार'ने सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन गैरसमज पसरवला आहे',असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे.

पान बहारने जेम्स बाँडला गंडवलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - 'जेम्स बाँड'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला हॉलिवूडचा स्टार पिअर्स ब्रॉस्ननवर 'पान बहार'ची जाहिरात केल्यामुळे सर्व स्तरातून टीका होत आहे. मात्र या कंपनीने जाहिरातींद्वारे 'जेम्स बाँड' पिअर्स ब्रॉस्ननला गंडवल्याचे समोर येत आहे. 'पान बहारने त्यांच्या सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे, तसेच त्याद्वारे गैरसमजदेखील पसरत आहे', असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे. पान बहारच्या प्रॉडक्टमध्ये शरीराला हानीकारक असलेल्या घटकांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रॉडक्टवरील आपण फोटो काढण्याची मागणीदेखील केल्याचे पिअर्सने सांगितले आहे.
कंपनीकडून अनधिकृतरित्या माझ्या चेह-याचा गैरवापर होत असल्याने मला स्वतःला धक्का बसल्याचेही पिअसर्न म्हटले आहे. 'तंबाखू, सुपारी यासारख्या शरीराला हानीकारक असणा-या घटकांचा समावेश नसलेल्या 'ब्रेथ फ्रेशनर' या एकाच प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी सहमती दर्शवली होती', असे पिअर्स ब्रॉस्ननने एका प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
आणखी बातम्या
'खासगी आयुष्यात मी माझी पत्नी, मुलगी आणि अनेक मित्रांना कॅन्सरमुळे गमावून बसलो आहे, असे असताना मी कॅन्सरसाठी जबाबदार असणा-या प्रॉडक्टची जाहिरात कशी करेन?, यामुळे केवळ आरोग्य सुधारण्यास मदत करतील, अशाच प्रॉडक्टच्या जाहिराती करण्याचे ठरवले आहे', असे स्पष्टीकरणही त्याने दिले आहे. 'मला भारत आणि भारतीयांप्रती खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यामुळे यापुढे आरोग्याला हानीकारक असलेल्या कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात करणार नाही, असे सांगत त्याने भारतीयांची माफी मागितली आहे.